PostImage

pramod abhiman raut

Oct. 20, 2023   

PostImage

Chimur warora mahamarg ; चिमूर वरोरा महामार्ग बांधकामात होत असलेल्या …


 

युवक काँग्रेस चिमूर च्या माध्यमातून खडसंगी गावातून जात असलेल्या वरोरा चिमूर महामार्ग बांधकामात होत असलेल्या गैरप्रकारची चौकशी...

चिमूर प्रतिनिधी :-

          आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोज शुक्रवार ला खडसंगी गावातील गावकरी व युवा मंडळी यांचे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वरोरा ते चिमूर महामार्ग बांधकाम सुरू आहे हा महामार्ग खडसंगी गावातून चिमुरकडे जातो. खडसंगी गावातून जे महामार्गाचे बांधकाम होत आहे हे शासनाने ठरविलेल्या इष्टीमेट नुसार होत नसून त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गैरप्रकार व भ्रष्टाचार होत असल्याताबाबत खडसंगी येथील गावकरी व युवा मंडळी यांचेकडून युवक काँग्रेस ला माहिती प्राप्त झाली. तसेच युवा मंडळी कडून विनंती करण्यात आली कीं या कामाची पाहणी करून होत असलेला गैरप्रकार उघडकीस करून आमच्या गावातून जाणारा महामार्ग हा व्यवस्थितरित्या बांधकाम व्हावा अशी गावकऱ्यांनी चिमूर युवक काँग्रेसला विनंती केली.
            खडसंगी गावकऱ्यांच्या विनंती ला मान देऊन युवक काँग्रेस चिमूर यांनी गावातील नागरिकांसोबत खडसंगी गावात सुरू असलेल्या कामाच्या मोक्क्यावर जाऊन संबंधित साईड इंजिनिअर यांचेकडून कामाची रूपरेषा जाणून घेऊन शहानिशा करून चौकशी केली असता सुरू असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा ज्या अंडरग्राउंग झाकीव नाल्या बांधण्यात आल्या त्या दोन्ही नाल्यांचे अंतर हे ऐकून 24 मीटर इष्टीमेटवर दिले आहे. परंतु प्रत्तेक्षात पाहणी केली असता महामार्गाच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या नाल्यांचे अंतर हे 24 मीटर नसून काही ठिकाणी 22 मीटर तर काही ठिकाणी 23 मीटर आहेत. तसेच महामार्ग मध्य भागातून उजव्या-डाव्या दोन्ही बाजूंचे 12-12  मीटर अंतर इष्टीमेंटवर दिले आहे तसे असायला हवे परंतु तसे न होता एका बाजूला कमी व एका बाजूला जास्त असा फरक मोजमाप केल्यानंतर दिसून आला.
           सूरु असणारे बरेच काम पूर्ण झाले असून झालेल्या कामात असा गैरप्रकार दिसून आला. परंतु सध्या खडसंगी गावाच्या मध्य भागात कामाला सुरूवात झाली असून त्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी मार्किंग करण्यात आली आहे. परंतु जी मार्किंग करण्यात आलेली आहे ती चुकीची मार्किंग असून जोपर्यंत झालेली मार्किंग दुरुस्त होत नाही. तोपर्यंत सदर मार्किंग झालेल्या ठिकाणी काम करू नये. तसेच सुरू असलेले महामार्गाचे बांधकाम हे दर्जेदार व पारदर्शक व्हावं. अन्यथा होत असलेल्या कामावर सर्व गावकऱ्यांचे समवेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रस चिमूर पदाधिकारी यांचेकडून कंत्राट असलेल्या KCC कंपनीला देण्यात आला आहे.
            तसेच सदर कामाचे सर्व दस्तऐवज व कामाचे इष्टीमेट हे माहितीच्या अधिकाराखाली मागणी करून झालेल्या कामाची पूर्ण चौकशी करून ज्या-ज्या ठिकाणी कामात गैरप्रकार झाला असेल अथवा भ्रष्टाचार झाला असेल त्या ठिकाणी कामात दुरुस्ती करून सदर कंत्राट असलेल्या कंपनीवर कार्यवाही व्हावी यासाठी आवाज उठवला जाईल व शासनाला धारेवर धरल्या जाईल. असा विश्वास खडसंगी गावातील जनतेला देण्यात आला.
             या सर्व आज रोजी झालेल्या घटनेत प्रमुख भूमिका प्रशांत डवले, विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस विधानसभा चिमूर तथा माजी. तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर व नागेंद्र चट्टे, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर यांनी पार पाडली असून कुणाल रामटेके, विवेक खोब्रागडे,  राजू गेडाम, अक्षय केमये, रोहित खोब्रागडे, अनिल जांगळे, सुनील गुडधे आमडी बेगडे आदी युवा वर्ग तथा गावकरी वर्ग यांची साथ मिळाली असून सर्वांच्या उपस्थितीत वरोरा-चिमूर महामार्ग खडसंगी येथील कामाची चौकशी करण्यात आली.